Devendra Fadnavis criticizes Congress state president Nana Patole

एनआयएच्या कारवाईत अनेक पुरावे मिळाले आहेत. यातला अजून एकच भाग बाहेर आला आहे. मनसूख हिरेन यांच्या हत्येचाही खुलासा व्हायचा बाकी आहे. याबाबतही लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. हे केवळ सचिन वाझेंपर्यंत मर्यादित नाही. यामध्ये कोण कोण आहे हे समोर यायला हवं. सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते, असं फडणवीस म्हणाले.

    पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी माझ्याकडे या प्रकरणाचे पुरावे आले त्यावेळी मी स्वत: अधिवेशनात मुद्दे मांडले. पोलिसातील लोकंच अशा प्रकारे काम करणार असतील, अशाप्रकारच्या गंबीर गुन्ह्यामध्ये सहभागी होणार असतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी?”, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    एनआयएच्या कारवाईत अनेक पुरावे मिळाले आहेत. यातला अजून एकच भाग बाहेर आला आहे. मनसूख हिरेन यांच्या हत्येचाही खुलासा व्हायचा बाकी आहे. याबाबतही लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. हे केवळ सचिन वाझेंपर्यंत मर्यादित नाही. यामध्ये कोण कोण आहे हे समोर यायला हवं. सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते, असं फडणवीस म्हणाले.

    मी सत्तेत असताना शिवसेनेने त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, असं सांगितलं होतं. मात्र, हे सरकार आल्यानंतर कोरोनाचं नाव सांगून सचिन वाझे यांना घेतलं गेलं. मुंबईतील प्रत्येक केस त्यांच्याकडेच जाईल अशाप्रकारची व्यवस्था होती. पण सरकारच्या या विश्वासामुळे आपण काहीही करु शकतो, असा अॅटीट्यूड वाझेंचा होता, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.