देवेंद्र फडणवीसांची बिहारमध्ये भाजप निवडणूक प्रभारी म्हणून निवड

बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपचे प्रभारी विद्यमान भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम करणार असल्याचे समजते आहे. गुरुवारी भाजप कोअर कमिटी बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या नावाची घोषणा प्रभारीपदासाठी होणार असल्याची दाट शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उत्तम काम करत आहेत. तसेच निवडणूकीमध्ये त्यांनी चांगले काम केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी पद देण्यात येणार असल्याची शक्यता भाजपच्या गोठात वर्तवली जात आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे या निवणुकीच्या पार्श्वभूमिवर हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपचे प्रभारी विद्यमान भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम करणार असल्याचे समजते आहे. गुरुवारी भाजप कोअर कमिटी बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या नावाची घोषणा प्रभारीपदासाठी होणार असल्याची दाट शक्यता आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते सी.पी.ठाकूर यांनी बिहार निवडणूक प्रभारीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, देवेंद्र फडणवीस हे उत्तम नेते आहेत. तसेच निवडणूकांमध्ये त्यांचे योगदान देखील उत्तम आहे. अशाप्रकारने फडणवीसांवर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केा आहे. कोरोना महामारिमध्ये सुरक्षेच्या दृष्टिने निवडणुकीत सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. तसेच निवडणूक आयोगाने या निवडणूकीत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. तसेच सोशल डिस्टिंन्सिंचे पालन करुन मतदान पार पाडण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टिने सर्व गोष्टींचा समावेश केला आहे.