Even Fadnavis had used threatening language when he was the Chief Minister Criticism of Sanjay Raut

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे काम विरोधी पक्षनेत्यांनी करू नये, असे संजय राऊतांनी सुनावले. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले नाही आणि होणारही नाही. महाराष्ट्राचे राजकीय गुणसुत्र जरा वेगळे आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले. तपास एटीएस आणि एनआयए या तपास यंत्रणा करीत आहेत. फडणवीसांनी आपमच तपासाचे सुत्रधार आहोत, असे समजू नये. तपास पुर्ण होवून निष्कर्ष आल्यावर दोषींना सजा दिली जाईल, असे राऊत म्हणाले.

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणात त्यांना दिशा देणारे सरकारमध्ये बसले आहेत त्यांची चौकशी करा, अशी मागणी करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव घ्यावे, असा प्रतिहल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

    मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे काम विरोधी पक्षनेत्यांनी करू नये, असे संजय राऊतांनी सुनावले. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले नाही आणि होणारही नाही. महाराष्ट्राचे राजकीय गुणसुत्र जरा वेगळे आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले. तपास एटीएस आणि एनआयए या तपास यंत्रणा करीत आहेत. फडणवीसांनी आपमच तपासाचे सुत्रधार आहोत, असे समजू नये. तपास पुर्ण होवून निष्कर्ष आल्यावर दोषींना सजा दिली जाईल, असे राऊत म्हणाले.

    मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा, असेही राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे सरकार स्थीर आहे आणि स्थीरच राहील, असेही ते म्हणाले.