devendra fadnavis

भारत बंद आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातील भारतबंदला आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या भारतबंदमध्ये मोठ्या संख्येने लोकं सहभागी झाले आहेत.

मुंबई : दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Agitation) करत आहेत. आज देशभरात भारतबंद (Bharat Band) आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनाला देशातील विविध विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज भारतबंद आंदोलन सकाळी ११ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

आजच्या भारत बंद आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातील भारतबंदला आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या भारतबंदमध्ये मोठ्या संख्येने लोकं सहभागी झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने मन मोठ करुन विचार केला तर आंदोलनामुळे त्यांना तणावाखाली येण्याची गरज भासणार नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भारतासारख्या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्र सरकारने ऐकायलाच हव्यात. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजचं बोलावं त्यांनी गेल्या १० वर्षापूर्वीचे बोलू नये. तसेच आपण काय वक्तव्य करतोय याचाही त्यांनी १० वेळा विचार करायला हवा. असा सल्लावजा टोलाही संजय राऊत यांनी फडणवीसांन लगावला आहे.