महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

मुंबई (Mumbai) :  यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीनसेे राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस भेटी देणार आहे. 19 आॅक्टोबरपासून बारामतीतून त्यांचा दौरा सुरू होत आहे.

  • बारामती जिल्ह्यातून पाहणीला सुरुवात करणार ; ९ जिल्ह्यांना देणार भेट

मुंबई (Mumbai) :  यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीनसेे राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस भेटी देणार आहे. 19 आॅक्टोबरपासून बारामतीतून त्यांचा दौरा सुरू होत आहे.

देवेंद्र फडणवीस येत्या सोमवारी बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. या दरम्यान ते कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते दुसर्‍या दिवशी, मंगळवारी (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी बुधवारी (२१ ऑक्टोबर) हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.