sachin waze

हिरेन यांच्या कॉल डिटेल्ससह, सीसीटीव्ही तपासणी, डिजिटल पुरावे गोळा केले जात आहेत. घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यासह तपासासंबंधीच्या विविध पैलूंचा शोध घेण्यात येत आहे. वाझे यांचाही जबाब नोंदविण्यात आल्याचे एटीएसच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत केलेला तपास आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबतही चौकशी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. माझ्यावर काय आरोप केले आहेत, हे बघून प्रतिक्रिया देईन असे वाझे म्हणाले.

  मुंबई : मनसुख हिरेन या अंबानी प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीची संशयीत हत्या झाल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून निलंबीत करा मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान राडा झाला. या संगळ्या गोंधळानंतर उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास करणारे आणि हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचीही चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.

  सचिन वाझे यांचा जबाब नोंदविला

  हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएसच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक युनिटमधील अधिकाऱ्यांची १० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येकाकडे वेगवगेळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

  हिरेन यांच्या कॉल डिटेल्ससह, सीसीटीव्ही तपासणी, डिजिटल पुरावे गोळा केले जात आहेत. घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यासह तपासासंबंधीच्या विविध पैलूंचा शोध घेण्यात येत आहे. वाझे यांचाही जबाब नोंदविण्यात आल्याचे एटीएसच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत केलेला तपास आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबतही चौकशी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. माझ्यावर काय आरोप केले आहेत, हे बघून प्रतिक्रिया देईन असे वाझे म्हणाले.

  PPE किट घातलेली व्यक्ती कोण?

  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके सापडली होती, ती चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. मनसुख हिरेन या कारचे मालक होते. त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शुक्रवारी दुपारी नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा शुक्रवारी अचानक मृतदेह आढळल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथका (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला.
  यानंतर तपासात मुंबई पोलिसांनी काही खुलासे केले आहेत. येथील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये स्कॉर्पिओ कारजवळ PPE किट घातलेली व्यक्ती दिसत आहे. गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्कॉर्पिओ आणि एक इनोव्हा कार दिसून आली होती. हीच इनोव्हा कार स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओचा पाठलाग करत होती. पीपीई किट घातलेली व्यक्ती कार ड्रायव्हर असेल असा संशय व्यक्त केला जात आहे.

  वाझे यांनी खून केल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप

  प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मयत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या पोलीसांना देण्यात आलेल्या जबाबातील काही मजकूर वाचून दाखवला. त्यात सचिन वा झे यांनी आपल्या पतीला अंबानी प्रकरणात अटक व्हावे म्हणून दबाव आणल्याचे म्हटल्याचे तसेच वाझे यांनीच खून केल्याचा उल्लेख असल्याचे ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, चाळीस लाख रूपयांच्या मिरा भाईंदर येथील जुन्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या धनंजय गावडे यांच्याकडे हिरेन यांचे शेवटचे लोकेशन सापडले आहे. तसेच वाझे आणि गावडे हे त्या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे वाझे यांना कलम २०१ अन्वये तातडीने अटक करून चौकशी करावी अशी मागणी त्यानी केली. यावेळी भाजप सदस्य आक्रमक झाले त्यांना वेलमध्ये येवून आक्रमक पणे घोषणाबाजी सुरू केली.