रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

फडणवीस म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात आपण डीसीपीची पद्धत स्विकारली आहे. या पद्धतीत महाराष्ट्र सरकार केंद्राच्या वतीने विकत घेते. त्यामुळे आपल्या राज्यातला तांदूळच आपल्या राज्यामध्ये जातो. आम्ही जो वारंवार पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांदूळाचा घोटाळा सांगतो तो हाच घोटाळा आहे आणि त्याचे धागेदोरे खूप वरपर्यंत गेले आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    मुंबई : पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या रेशन तांदूळात घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार भाजपकडून करण्यात येत आहे. या घोटाळ्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांपासून ते राईस मिलच्या मालकांपर्यंत हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान आता विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.

    फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    फडणवीस म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात आपण डीसीपीची पद्धत स्विकारली आहे. या पद्धतीत महाराष्ट्र सरकार केंद्राच्या वतीने विकत घेते. त्यामुळे आपल्या राज्यातला तांदूळच आपल्या राज्यामध्ये जातो. आम्ही जो वारंवार पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांदूळाचा घोटाळा सांगतो तो हाच घोटाळा आहे आणि त्याचे धागेदोरे खूप वरपर्यंत गेले आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मध्यवर्ती निवडणूकांवर देखील फडणवीसांनी भाष्य केलं आहे. तसेचं ठाकरे सरकार मध्यवर्ती निवडणूका घेणार नाही, कारण सरकारला माहितीय की लोकांना सरकारबद्दल एवढी नाराजी आहे. मध्यवर्ती निवडणूका झाल्या तर हे सरकारच धाराशाही होईल, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. तर सहकार क्षेत्रावरून देखील फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोले लगावले.

    दरम्यान, ज्यांनी सहकार श्रेत्रात चांगलं काम केलं, त्यांनी या नव्या खात्याचं स्वागतच केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह हे खूप आधीपासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली. ज्यांनी सहकार चळवळीत चुकीचं काम केलं. सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्याबाबत भीती आहे, अशी टीका देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली आहे.