तुम्हाला काय इथे भजी-वडे तळायला बसवलंय?; देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवालही फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला. 

    मुंबई – १२ आमदारांच्या केलेल्या निलंबनानंतर विधानसभा अधिवेशनात भाजपाने सत्ताधाऱ्यांविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. (Vidhan Sabha Adhiveshan) दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपाने माध्यमांच्या कक्षात जाऊन प्रतिविधानसभा आयोजित केली.

    यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवालही फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला.

    देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, आम्ही विविध विषयावर प्रश्न उपस्थित करून सरकारची पोलखोल करत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही बंद करू शकत नाही. सरकारला लोकशाहीची चाड नाही. मात्र आम्ही लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आहोत.