Devendra Fadnavis's unequivocal answer to Sanjay Raut who accused BJP from ED inquiry

केंद्र सरकारकडून तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर काँग्रेसच्या काळात जास्त झाला. भाजप अशा संस्थांचा वापर राजकारणासाठी करत नाही असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीच्या ईडी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यानंतर संजय राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडताना भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

केंद्र सरकारकडून तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राऊतांनी पत्रकार परिषदेत केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर काँग्रेसच्या काळात जास्त झाला. भाजप अशा संस्थांचा वापर राजकारणासाठी करत नाही असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

ईडी आधी पुरावे गोळा करते त्यानंतर संबंधिताला नोटीस बजावली जाते. यानंतरच चौकशी केली जाते. यामध्ये सूडबुद्धीचे राजकारण कोठे आहे? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

“चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही असा टोलाही फडणवीस यांनी राऊतांना लगावला.