नागपुरातील निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता द्यावी, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बर्‍याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    नागपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असून निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

     फडणवीस यांनी पत्रात काय म्हटलं आहे ?

    नागपुरातील कोरोना संसर्गाचे लक्षणीयरित्या कमी झालेले प्रमाण, विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती, वाढत असलेला रोष पाहता नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले आहे.

    राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प

    राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बर्‍याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    कोरोनाविरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये

    पुढे म्हणाले की, कोरोनाविरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. कल्याणमध्ये व्यापार्‍याने आत्महत्या केली, नालासोपार्‍यात एका युवकाने जीवन संपविले, चंद्रपुरात एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली.

    नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज

    नागपुरातील कोरोनाच्या गेल्या १० दिवसांतील स्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. १७ ते २७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत नागपुरात एकूण झालेल्या चाचण्या ५९,९४८ इतक्या आहेत, तर त्यात कोरोना संसर्ग आढळून आलेले रूग्ण ५८ इतके आहेत. हे प्रमाण ०.१० टक्के इतके आहे. त्यामुळे आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे.