Dhananjay Munde accused of rape; Reaction of close friend Amol Kolhe

बलात्काराच्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधकांनी पहिलं आपलं तोंड आरशात पाहावं असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार आणि धनंजय मुंडेंचे जिवलग मित्र अमोल कोल्हे यांनी भाजपा नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधकांनी पहिलं आपलं तोंड आरशात पाहावं असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार आणि धनंजय मुंडेंचे जिवलग मित्र अमोल कोल्हे यांनी भाजपा नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर अमोल कोल्हेंनी दोरदार टीका केली आहे. आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती? असा सवाल करतानाच विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे, असा पलटवार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

धनंजड मुंडे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असून तेच यावर अधिक बोलतील असं म्हणत अमोल कोल्हे यांनी भाजपा नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेची बहिण करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली आहे. मात्र, यानंतरही धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप होत आहे.