janata darbar dhananjay munde

बलात्काराच्या आरोपामुळे आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरात लवकर निर्णय घेऊ असे म्हंटले आहे. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. स्वत: मोठ्या अडचणीत असताना धनंजय मुंडेनी जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या.

मुंबई : बलात्काराच्या आरोपामुळे आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरात लवकर निर्णय घेऊ असे म्हंटले आहे. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. स्वत: मोठ्या अडचणीत असताना धनंजय मुंडेनी जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या.

बलात्कारामुळे अडचणीत सापडलेल्या मुंडे यांच्यावर मोठ राजकीय संकट (Dhananjay Munde )ओढवल आहे. यामुळे धनंजय मुंडे यांचा नियोजीत जनता दरबाराचा कार्यक्रम रद्द होऊ शकतो अशी चर्चा सुरु होती.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात होणाऱ्या या जनता दरबाराला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. अगदी नेहमी प्रमाणे त्यांनी जनता दरबारात उपस्थित राहिलेल्या नागरीकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. तसेच सोडवण्याबाबत संबंधितांना सूचनाही केल्या.

या जनता दरबाराचे फोटो आणि व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.