धनंजय मुंडे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र

धनंजय मुंडे म्हणाले की, आज आम्ही बैठकीस एकत्रित आलो हा योगायोग नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांचे सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि बिहारच्या निवडणूक प्रभारी पदी निवड होणं हा योगायोग आहे. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेल टोलाही लगावला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पार्थ पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राजकारणात हालचारलींना वेग आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात वेगाने घडामोडी घडत आहेत. यावर कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करुन पार्थ पवार हे चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आपली भूमिका मांडणार आहेत. शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते दाखल झाले होते. आज झालेल्या बैठकीत नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. 

या बैठकीस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, आदिती तटकरे, आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. परंतु बैठकीदरम्यान काय चर्चा झाली या बद्दल अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झाली नाही आहे. धनंजय मुंडेंनी बैठक संपन्न झाल्यानंतर माध्यमांशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.