dhananjay munde

सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या महिलेने ओशीवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली. मात्र, रेणु शर्माच्या तक्रारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सरकारची पाठराखण करण्यात आली आहे.

मुंबई : रेणु शर्मा नावाच्या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तक्रारदार महिलेची बहिण करुणासह परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली आहे. यानंतर या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या महिलेने ओशीवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली. मात्र, रेणु शर्माच्या तक्रारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सरकारची पाठराखण करण्यात आली आहे.

आरोप तर होतच राहतात. जे आरोप करतात त्यांना तसा अधिकारही आहे. पण विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असे नवाब मलिक म्हणाले.