renu sharma

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचे नाव रेणू अशोक शर्मा (Renu Ashok Sharma) असे आहे. रेणू ही एक बॉलिवूड सिंगर आहे. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख १९९७ मध्ये झाली होती. असा दावा रेणू यांनी तक्रारीत केला आहे.

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) तक्रार दाखल केली आहे. तसेच या महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, असा खळबळजनक खुलासा धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या (Facebook)  माध्यमातून केला आहे. मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. परंतु रेणू शर्मा ही महिला कोण आहे आणि त्यांचे या महिलेशी काय संबंध होते. असा प्रश्न सध्या समाज माध्यमांमध्ये घोंघावू लागला आहे.

कोण आहे ही महिला?

मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचे नाव रेणू अशोक शर्मा असे आहे. रेणू ही एक बॉलिवूड सिंगर आहे. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख १९९७ मध्ये झाली होती. असा दावा रेणू यांनी तक्रारीत केला आहे. रेणू आणि मुंडे यांची पहिली भेट मध्य प्रदेशातून इंदोरमध्ये रेणू यांची बहिण करूणा शर्मा यांच्या घरी झाली होती. तेव्हा रेणूचे वय १६ ते १७ वर्ष इतके होते. १९९८ मध्ये धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये करूणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेल्या. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होते. याचाच फायदा घेत मुंडे काहीही न सांगता रात्री तिच्या घरी गेले आणि रेणू यांच्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे गंभीर आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केला आहे.

तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन

शारीरिक संबंधानंतर मुंडेंनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. असे रेणू यांनी सांगितले. पुढे सांगितले की, जर तुला सिंगर बनायचे असेल. तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या दिग्दर्शक निर्मात्यांशी भेट घडवून देईन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझी बहिण घराबाहेर गेल्यानंतर मुंडे माझ्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचे, असे रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा…

#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत

कालपासून समाज…

Dhananjay Munde यांनी वर पोस्ट केले मंगळवार, १२ जानेवारी, २०२१