” धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात”

मागील काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात, असंही तृप्ती देसाई यांनी व्हिडिओद्वारे म्हटलं आहे.

मुंबई (Mumbai). मागील काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात, असंही तृप्ती देसाई यांनी व्हिडिओद्वारे म्हटलं आहे.

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी मोठी हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाचे राजकारण करण्यास सुरुवात झाली. मात्र रेणू शर्मा आणि तिच्या वकिलावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना देखील धमक्या देणे, ट्रोल करणे, असे प्रकार झाले. या दबावाखाली रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी लागली, असा दावा तृप्ती देसाई यांनी फेसबुकद्वारे केला आहे.

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री तसेच सरकारमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला. तुम्ही जर हिंमतीने पोलीस ठाण्यात गेलात, तर तुम्हाला न्याय मिळणार नाही, असा संदेश सध्या राज्यभर या प्रकरणातून जात आहे. तसेच यावरूनच नेमकी मानसिकता आपल्या राज्यात काय आहे, हे लक्षात दिसूय येते, असं तृप्ती देसाई यांनी सांगितले.