धारावीत ३३ नवे रुग्ण – कोरोनाबाधितांची संख्या १०६१ वर

मुंबई : धारावीत गेल्या २४ तासांत ३३ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे.आता कोरोना रुग्णांची संख्या १०६१ झाली

 मुंबई  :  धारावीत गेल्या २४ तासांत ३३ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे.आता कोरोना रुग्णांची संख्या १०६१ झाली आहे. मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प,  इंदिरा नगर, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी , सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला, कुंचीकुरवे नगर या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत रुग्णांचा आकडा कमी अधिक होत असल्याने आरोग्य विभागात चिंता व्यक्त केली जात आहे.

दादरमध्ये ६ नवीन रुग्ण 
दादर परिसरात कोरोनाचे रोज नवे रुग्ण  आढळत असून गुरुवारी दादर परिसरात ६ नवे रुग्ण आढळल्याने दादरमधील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १३९ वर पोहोचली आहे. दादरमधील मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे. तसेच ४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.
 
 
माहीममध्ये ७ नवे रुग्ण
माहीम कोरोनाचे केंद्र बिंदू ठरत आहे.गुरुवारी माहीममध्ये कोरोनाचे ७ नवे रुग्ण आढळल्याने माहीम मधील कोरोना रुग्णांची संख्या १६८ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आकडा ८ वर पोहोचला आहे. ५३जणांना आरोग्य विभागाने घरी सोडले आहे.