धारावीत कोरोनाचा कहर ; गेल्या २४ तासांत ६६ नवे रुग्ण

मुंबई : धारावीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून धारावीत गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १,०२८ वर पोहोचली

 मुंबई :  धारावीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने  होत असून धारावीत गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १,०२८ वर पोहोचली असून आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.  गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प,  इंदिरा नगर, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला,  कुंची कुरवे नगर,  या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांमुळे हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,०२८ वर पोहोचली असून त्यापैकी ४० जणांचा मृत्यू झाला आहे. 

दादरमध्ये ८ नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या १३३
दादर परिसरात कोरोनाचे रोज नवे रुग्ण  आढळत असून आज दादर परिसरात कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळल्याने दादरमधील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे. तर दादरमधील मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे. 
 
माहीममध्ये १२ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या १५५
माहीम कोरोनाचे केंद्र बिंदू ठरत आहे. आज माहीममध्ये कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळल्याने माहीम मधील कोरोना रुग्णांची संख्या १५५ वर पोहोचली आहे. तर माहीम मध्ये ही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आकडा ७ वर पोहोचला आहे.