धारावीत २५ नवे रुग्ण-  दादरमध्ये २५ तर माहीममध्ये ३३ कोरोना रुग्णांची आज नोंद

मुंबई : धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून आज केवळ २५ नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या २०६८ वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत

 मुंबई :   धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून आज केवळ २५ नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या २०६८ वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून रुग्णसंख्या घटली असल्याचे समोर आले आहे. आज धारावीत २५ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या २०६८ वर पोहोचली आहे. आजही कुणीही रुग्ण दगावला नसून मृतांचा आकडा ७७ इतका झाला आहे. तर माहीममध्ये आज ३३ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ७९२ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १४ इतका आहे. दादरमध्ये आज २५ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही ५४०  इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १६ मृत्यू झाले आहेत. धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. जी उत्तर विभागात आज दिवसभरात ८३ नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ३४००इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७ इतका आहे.