धारावीत आज आणखी २६ कोरोनाबाधितांची नोंद-  दादरमध्ये नवे ४ रुग्ण तर महिममध्ये ७ रुग्णांची वाढ

मुंबई : धारावीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. आज नवीन २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांची संख्या २९ झाली असून बधितांची संख्या

 मुंबई : धारावीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. आज नवीन २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांची संख्या २९ झाली असून बधितांची संख्या ८५९  झाली आहे.तर आतापर्यंत २२२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जी- उत्तर विभागात असलेल्या धारावीप्रमाणे याच विभागातील दादर मध्ये आज ४ नवीन बाधित रुग्ण मिळाले. एका ८०  वर्षीय महिलेचा मॄत्यु झाला आहे.  त्यामुळे तेथे बाधित रूग्णांची संख्या १०९ झाली आहे. दादरमध्ये आजपर्यंत ६ जणांचा मृत्यू झालेला आहे तर १७ जण बरे होऊन घरी परतले आहेत.

माहिममध्येही  आज नवीन ७ बाधित रुग्ण मिळाले आहे.  ५९ वर्षीय पुरुष आणि ७० वर्षीय पुरुष असे २ जणांचे मृत्यू झाले आहेत. तिथेही आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झालेला असून २८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर  आतापर्यंत ११९ बाधित झाले आहेत. धारावीत मिळालेले २६ बाधित रुग्ण प्रेम नगर, केळे वखार, राजीव गांधी नगर, ९०  फूट रोड, ढोर वाडा, मुकुंद नगर,मुस्लिम नगर, न्यू म्युनिसिपल चाळ, सोशल नगर, सिद्धिविनायक चाळ, कुंभार वाडा, अनवर चाळ, लेबर वसाहत, वैभव सोसायटी, धरावी क्रॉस रोड आदी विभागातील आहे. तर दादर विभागातील स्वाती मनोज सोसायटी, कोहिनूर टॉवर, भवानी सोसायटी येथे रुग्ण आढळून आले आहेत.
तसेच माहिम विभागातील माहीम सिटीलाइट सिनेमा, कोळीवाडा, नूरी बिल्डिंग, मोरी रोड, माहिम कोळीवाडा, कर्नाटका सोसायटी येथे आढळून आले आहेत.