धारावीत रुग्णवाढ नियंत्रणात ; दिवसभरात १९ नवीन रुग्ण

मुंबई : धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून गेल्या २४ तासांत १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १८४९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ७१

मुंबई :  धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून गेल्या २४ तासांत १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १८४९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने मृतांचा आकडा ७१ वर स्थिर राहिला असून,  प्रशासनाला याबाबत यश आले आहे. 

मात्र रुग्णवाढ सुरूच असून रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र रुग्णवाढीचा दर नियंत्रणात येत असल्याचे दिसते. तर माहीम मध्ये  २५ नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्णांची  संख्या ५७४ तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दादर मध्ये आज १० नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या  ३४७ झाली आहे. तर दादर आतापर्यंत १२ जणाचा मृत्यु झाला आहे. तीनही परिसर मिळून जी उत्तर विभागातील आज ५४ रुग्ण सापडले असून रुग्णांचा आकडा २७७० तर मृतांचा आकडा ९० इतका आहे.