corona in dharavi

शनिवारी धारावीत फक्त २ नवीन रुग्ण(Only 2 Patients Found In Dharavi) आढळले. येथे २१ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने चाललेली वाटचाल धारावीकरांना दिलासा देणारी आहे.

    मुंबई: आशियातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाला(Corona In Dharavi) रोखण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेला(BMC) यश आले आहे. शनिवारी धारावीत फक्त २ नवीन रुग्ण(Only 2 Patients Found In Dharavi) आढळले. येथे २१ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने चाललेली वाटचाल धारावीकरांना दिलासा देणारी आहे.

    मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश आले.

    मुंबईत राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलचे जगभरात कौतुकही झाले. फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यावेळी धारावीतही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला. रोज रुग्णांची संख्या ७० ते ८० वर पोहचली. मात्र पालिकेने येथे पुन्हा यंत्रणा कामाला लावली. घरोघरी सर्वेक्षण, चाचण्यांची संख्या वाढवली. आरोग्य शिबिरे, कंटेनमेंट झोन, क्वारंटाईनचे नियमांची अमलबजावणी, जनजागृती, उपचार पद्धती आदी उपाययोजनांमुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.