YES Bank founder Rana Kapoor arrested; ED's big action

येस बँकेच्या ३७०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर ५ मार्चपासून निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे.

    मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी आणि राधा कपूर खन्ना यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डीएचएफएल प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाला त्यांनी याचिकेतून आव्हान दिले असून न्यायालयाने सोमवारी मात्र तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

    येस बँकेच्या ३७०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर ५ मार्चपासून निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे.

    हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी आणि राधा कपूर खन्ना यांनाही अटक करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १८ सप्टेंबर रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्या निर्णयाला तिघिंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

    सीबीआय न्यायालयाने दिलेला आदेश अत्यंत बेकायदेशीर आणि अयोग्य असल्याचा दावा याचिकेतून केला आहे. चौकशीदरम्यान आपल्याला अटक कऱण्यात आली नसून आपण सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य केले असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे कागदोपत्री स्वरूपाचे असून आधीच सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे कागदपत्रांशी किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

    तसेच कथित व्यवहारांमध्ये किंवा येस बँकेमध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नव्हती. असा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे. सदर याचिकेवर सोमवारी न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली तेव्हा, न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.