प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

 विधानपरिषदेच्या एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी तसेच ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान झाले. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघात भाजपचे अमरिश पटेल यांचा एकतर्फी विजय झाला आहे. धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

  • पदवीधर-शिक्षकमध्ये निकाल विलंबाने, महाआघाडीची चलती!

मुंबई (Mumbai). विधानपरिषदेच्या एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी तसेच ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान झाले. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघात भाजपचे अमरिश पटेल यांचा एकतर्फी विजय झाला आहे. धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

अमरावती शिक्षकांमध्ये पहिल्या फेरीत भाजपचे नितीन धांडे यांना  धक्का;  तर पुणे, औरंगाबाद मध्ये पदवीधरमध्ये महाविकास आघाडीवर!
अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघात पहिली फेरीला, भाजपचे नितीन धांडे यांना जबर धक्का बसला. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक ३१३१ मतांसह आघडीवर, तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना २३०० मते मिळाली आहेत.

औरंगाबाद पदवीधरमध्ये आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर 
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली असून पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना दहा हजारांची आघाडी मिळाली आहे. भाजपचे शिरीष बोराळकर पिछाडीवर असून पहिल्या फेरीची मतमोजणी अजूनही सुरूच आहे.

पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची मुसंडी 
पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मुसंडी मारली आहे.  भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

पदवीधर-शिक्षकच्या निकालांना विलंबाची शक्यता
पदवीधर आणि शिक्षक या निवडणूकांचे निकाल हाती येण्यास बराच कालावधी लागणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी देत आहेत. या मध्ये पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले २, अधिक १ मत आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ पर्यंत निकाल अपेक्षित आहेत. मात्र अनेक निवडणूक रिंगणात पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही.  तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत आणि ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधर साठी ६० फेऱ्या तर शिक्षकसाठी ३२ फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री ९ नंतर पुढे ३० तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षक साठी १६ तास लागू शकतात असा प्रशासनाचा अंदाज आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी २ लाख ४७ हजार ९१७ तर शिक्षकसाठी ५३ हजार१९ इतके मतदान झाले आहे. या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी  रात्रीचे नऊ वाजू शकतात, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले असून जर या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजया साठीचा कोटा पूर्ण केला तर शिक्षकचा निकाल साधारण सायंकाळी ७ वाजता तर पदवीधर चा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो.
‘महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरिश पटेल यांचे गुलाम, अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच अशी टिका राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे.

दरम्यान, औरंगाबादेत अजूनही मतपेट्या उघडण्याचेच काम सुरू झाले असून, मतपेट्या उघण्याचे काम, मतपेट्या उघडून बॅलेट पेपरचे २५चे गठ्ठे तयार करणार, सर्व गठ्ठे एकत्र करून पुन्हा हजार मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणार, त्यानंतर प्रत्यक्ष मोजणी, अंतिम निकालास उशीर होणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजप सर्व जागा जिंकणार: नितेश राणे

आजचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी विजयाचा दिवस राहणार आहे. हे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं. याची सुरुवात अमरीश पटेल यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच्या सर्वच जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असा आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला.
पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, पदवीधर साठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४२ टेबल, मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी ६ हॉल, पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक, ‘शिक्षक मतदार’साठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती , ४५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानाचा टक्का वाढल्याने सत्ताधाऱ्यांना फटका: शिरीष बोराळकर
औरंगाबाद पदवीधरमध्ये या वेळेला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. त्यामुळे मतदान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात झाले आहे. जेंव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेंव्हा त्याचा फायदा विरोधी पक्षाला होतो. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीचा प्रक्रिया सुरू
अमरावती: विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज रोजी होणार आहे. येथील विलासनगरातील शासकीय गोदामात ही सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण ३० हजार ८६९ मतदारांनी मतदान केले.