१२ आमदार गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का?; संजय राऊतांचा सवाल

राज्यपालांवर जर कोणाचा राजकीय दबाव असेल तर तस त्यांनी स्पष्ट करावे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर बारा आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. तरीही त्यांनी अजून मंजुरी का दिली नाही. ही जी नावे आम्ही दिली ते काय गुंड , बदमाश किंवा अफगाणिस्तान मधील तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

    मुंबई : विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का अस विचारत जी १२ जणांची नावे आम्ही आमदार नियुक्ती साठी दिली ते काही गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का असा सवाल संजय राऊतांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

    बुधवारी १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसह मविआच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. त्याबाबत संजय राऊत म्हणाले, ‘भेटी संदर्भात निर्णय काय लागेल हे राज्यपालांनी आपल्या कृतीतून दाखवायला हवं. काल मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना भेटले त्यांचे हसरे चेहरे सर्वांनी पाहिले, त्यामुळे तिकडचा माहोल किती सकारात्मक होता हे समजले असेल. असं राऊत म्हणाले.

    तसेचं खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, राज्यपालांवर जर कोणाचा राजकीय दबाव असेल तर तस त्यांनी स्पष्ट करावे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर बारा आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. तरीही त्यांनी अजून मंजुरी का दिली नाही. ही जी नावे आम्ही दिली ते काय गुंड , बदमाश किंवा अफगाणिस्तान मधील तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे १२ जणांच्या यादीतून नाव वगळल्याची सूत्रांची माहिती समोर येत आहे.