Did Mahadev Jankar really meet Sharad Pawar just for that? The important person who was present during this visit made a big revelation

विधान परिषदांच्या निवडणुकात भाजपला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर जानकर यांच्या या भेटीला महत्व आले आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याने जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई :  राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. जानकर भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चाही रंगली होती. माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण, त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करत जानकर यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जानकर आणि पवार यांच्या भेटीवेळी हजर असलेल्या एका व्यक्तीने महत्वाचा खुलासा केला आहे.

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केलं होते. यानंतर आता  गुट्टे यांनीही या भेटीमागचे खरे कारण सांगीतले आहे.

साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भाने आम्ही शरद पवारांना भेटलो असा खुलासा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. महादेव जानकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतल्याने भाजपचा आणखी एक मित्र दुरावणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या सर्व चर्चा चुकीच्या असून, साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही दोन्ही नेत्यांना भेटलो, असे स्पष्टीकरण आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिले आहे.

ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचे जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामील होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.