udhav thackrey

कोरोनाची लस विकसीत करत असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यांनी या आगीमागे घातपाताची शंका व्यक्त केली. आग लागली की लावली? असा प्रश्नच यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई : कोरोनाची लस विकसीत करत असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यांनी या आगीमागे घातपाताची शंका व्यक्त केली. आग लागली की लावली? असा प्रश्नच यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

“त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल तर, ती माहिती तर जरुर द्यावी. त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

“देशातील लसीकरण मोहिमेत सीरमचा सिंहाचा वाटा असून त्याच संस्थेत आग लागली आहे. कोव्हिडची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते तिथे आग लागली होती. ही आग नियंत्रणात आली असून एकूण सहा जणांना बाहेर काढण्यात यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.