लसींच्या किंमतींमध्ये तफावत; शिवसेना नेत्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

लसीकरणच्या किंमतीवरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगले आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून लसीची किंमत ठरवण्यात आली आहे. या किंमतींवरुन वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सचिव रघुनाथ कुचिक यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहले आहे. रघुनाथ कुचिक यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन या लिहलेल्या पत्रात करोनावरील लसीच्या किंमतींवर बोट ठेवले आहे.

    मुंबई : लसीकरणच्या किंमतीवरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगले आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून लसीची किंमत ठरवण्यात आली आहे. या किंमतींवरुन वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सचिव रघुनाथ कुचिक यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहले आहे. रघुनाथ कुचिक यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन या लिहलेल्या पत्रात करोनावरील लसीच्या किंमतींवर बोट ठेवले आहे.

    स्वत:च्या फायद्यासाठीच काम होतंय

    भारतातील कोरोनावरील लसींच्या किंमतींबाबत चिंतीत आहोत. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इतर देशांसोबतही करार केला आहे. या देशातील लसींच्या किंमतींमध्ये तफावत आहे. याचाच अर्थ फार्मा कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था भारतात आहे. त्यामुळे भारतातील नागरिकांना पहिले लस मिळावी ही त्यांची पहिली प्राथमिकता असावी असे नाही वाटत का?, असा सवालही कुचिक यांनी केला.

    इतर देशातील लसींच्या किंमतीचा उल्लेख

    सीरम इन्स्टिट्युटच्या लसीची एका डोसची किंमत साऊथ आफ्रिकामध्ये ३८९ रुपये आहे. अमेरिकेत १६० रुपये, सौदी अरेबियात २८९ रुपये, बांगलादेशमध्ये२९६ रुपये तर, ब्राझिलमध्ये २३३ रुपये तर, ब्रिटनमध्ये २२२ रुपयांना आहे. तसा करार कंपनीने केला आहे, याकडेही कुचिक यांनी लक्ष वेधले आहे.