कोरोनाचा सर्वव्यापी परिणाम, आता जार विकणाऱ्यांच्या पोटावर कोरोनाचा पाय, नागरिकांची जारकडे पाठ

पिण्याच्या पाण्यासाठी अनेकजण विकत तर अनेकजण भाड्याने जार आणतात. या जारमधील थंडगार पाणी वर्षानुवर्षं सर्वसामान्यांची तहान भागवत आलं आहे. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या जारची मागणी घटत चाललीय. जारमधून इन्फेक्शन होण्याच्या शक्यतेने नागरिकांनी जार वापरणे बंद केले आहे. 

    एखादे संकट आले म्हणजे कसे चहुबाजूंनी येते आणि समाजातील अनेक घटकांना ते कसे व्यापून टाकू शकते, याची उदाहरणे कोरोना काळात समोर येत आहेत. सध्या कोरोनाचा असाच फटका बसतो आहे तो जार उद्योगाला. एरवी कार्यालये आणि सोसायट्यांमध्येदेखील पिण्याच्या पाण्यासाठी जारचा वापर केला जातो.

    पिण्याच्या पाण्यासाठी अनेकजण विकत तर अनेकजण भाड्याने जार आणतात. या जारमधील थंडगार पाणी वर्षानुवर्षं सर्वसामान्यांची तहान भागवत आलं आहे. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या जारची मागणी घटत चाललीय. जारमधून इन्फेक्शन होण्याच्या शक्यतेने नागरिकांनी जार वापरणे बंद केले आहे.

    कोरोना काळात साधे पाणी वापरू पण इन्फेक्शनचा धोका नको, अशी भूमिका अनेकजण घेत असल्यामुळे जारची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संक्रांत ओढवलीय. कोरोनाची पहिली लाट दुसऱ्या लाटेपेक्षा भयंकर आणि अधिक घातक आहे. या लाटेत ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचाही मृत्यू होत आहे. त्यामुळे नियमित जार घेणाऱ्या व्यक्तींनीही आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणासाठी जार घेणे बंद केले आहे.

    महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छोटे मोठे उद्योजक जार विकण्याचे आणि घरोघरी पाण्याचे जार पुरवण्याचा व्यवसाय करतात. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्यांचा व्यवसाय कमी झाला असून पुढील काही महिने हे चित्र असंच राहण्याची चिन्हं आहेत.