गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी, परप्रांतीयांना सोयी सुविधा – संदीप देशपांडे

  • संदीप देशपांडे म्हणाले की, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सोयी सुविधा दिल्या आहेत. कोकणातील चाकरमाणी गणेशोत्सवाला दरवर्षी गावाला जातात पण कोरोनामुळे सरकारने कोणतीही सोय सुविधा केलेली नाही. परप्रांतीयांना जाण्यासाठी सोय केली ते परत आलेही. तरीही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुविधा नाही. त्यांच्यासाठी बसेस सुरु केल्या नाही. सरकारला जर चाकरमान्यांसाठी बसेस ची सुविधा करायची नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, राज्य सरकारने आम्हाला परवानगी द्यावी. अशी टीका संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर केली.

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. या मुद्द्यावरुन राज्यात चांगलेच राजकारण चालु आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठबळ दिले आहे. या विषयावर मनसेने सरकारवर निशाणा साधला आहे. परराज्यातील लोकांना पाठवलं, ते परतही आले, मात्र कोकणातील चाकरमान्यांना कोकणात जण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही. असा निशाणा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सकारवर साधला आहे. 

संदीप देशपांडे म्हणाले की, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सोयी सुविधा दिल्या आहेत. कोकणातील चाकरमाणी गणेशोत्सवाला दरवर्षी गावाला जातात पण कोरोनामुळे सरकारने कोणतीही सोय सुविधा केलेली नाही. परप्रांतीयांना जाण्यासाठी सोय केली ते परत आलेही. तरीही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुविधा नाही. त्यांच्यासाठी बसेस सुरु केल्या नाही. सरकारला जर चाकरमान्यांसाठी बसेस ची सुविधा करायची नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, राज्य सरकारने आम्हाला परवानगी द्यावी. अशी टीका संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर केली. 

कोकणात यायला बंदी नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुबईतील चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न खासदार विनायत राऊत यांना करण्यात आला. त्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, कोकणात यायला बंदी नाही राज्य सरकारने चाकरमानी जिथून येतील तिथेच कोरोना चाचणी माफक दरात करुन घ्यावी. तर कोकणात येण्यासाठी चाकरमानींना बंदी घातल्यास आंदोलन करण्यात येल असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.