लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका – दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांना दहीहंडीच्या (Dahihandi) मुद्द्यावरून फटकारले आहे.

    मुंबई: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांना दहीहंडीच्या (Dahihandi) मुद्द्यावरून फटकारले आहे. लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

    दिलीप वळसे-पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला आहे. सर्व जगात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. ही लाट आली तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये, असं आवाहन वळसे-पाटील यांनी केलं.