१४,५०० कोटींच्या घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप: ED ने अभिनेता दिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यावधींची मालमत्ता केली जप्त

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता दिनो मोरया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती सक्तवसूली संचलनालयानं जप्त केली आहे. गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेक समुहाशी निगडीत एका घोटाळ्याप्रकरणी ईडीद्वारे ही कारवाई करण्यात आली. गुजरातमधील व्यावसायीक संदेसारा बंधुंच्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

    मुंबई : महाराष्ट्रात एनफोर्समेंट डायरेक्टरेटने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात दिनो मोरया, संजय खान आणि डीजे अकील यांच्या कोट्यवधींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. डिनो हे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी अहमद पटेल यांची भूमिका सक्रियपणे दिसली. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले.

    काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता दिनो मोरया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती सक्तवसूली संचलनालयानं जप्त केली आहे. गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेक समुहाशी निगडीत एका घोटाळ्याप्रकरणी ईडीद्वारे ही कारवाई करण्यात आली. गुजरातमधील व्यावसायीक संदेसारा बंधुंच्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

    पीएमएलए कायद्याअंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे सुरूवातीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सक्तवसूली संचलनालयानं दिली आहे. या संपत्तीची एकूण किंमत ८.७९ कोटी रूपये इतकी आहे. यामध्ये खान याच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत तीन कोटी रूपये आहे. तर दिनो मोरयाच्या संपत्तीची किंमत १.४ कोटी रूपये आणि डीजे अकील म्हणजेच अब्दुलखलील बचुअलीच्या संपत्तीची किंमत १.९८ कोटी रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी याच्या संपत्तीची किंमत २.४१ कोटी रुपये इतकी आहे.

    स्टर्लिंग बायोटेक समूहाच्या फरारी प्रवर्तक नितीन सांदेसरा आणि चेतन संदेसारा यांनी या गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम चार जणांना दिली असल्याचं ईडीनं सांगितलं. नितीन संदेसारा, चेतन संदेसारा, त्याची पत्नी दीप्ती संदेसारा आणि हितेश पटेल या चौघांना फरार आर्थिक अधिकारी घोषित केलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरण स्टर्लिंग बायोटेक आणि मुख्य प्रवर्तक तसंच संचालकांनी केलेल्या १४,५०० कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीशी संबंधित आहे.

    dino morea sanjay khan and dj aqeel properties attached in money laundering case