ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले ते ९५ वर्षाचे होते. दादर येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्ष पत्रकारितेत मोलाचे कार्य केले.

दिनू रणदिवे यांचा जन्म डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ मध्ये झाला. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरूवात केली. महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते मटातून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. 
गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांचा सहभाग होता.