रिक्षाचालकांच्या बँक खात्यावर थेट मदत; उद्यापासून १५०० रुपये मिळणार

लॉकडाऊन घोषित करतेवेळी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी रिक्षाचालकांना १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली हाेती. त्यानुसार मुंबई, ठाण्यासह राज्यातील  परवानाधारक रिक्षाचालकांना मदतनिधी उपलब्ध करून देण्याची ऑनलाईन प्रक्रिया २२ मे पासून सुरू होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मदत वितरित करण्याचे निर्देश दिले होते.

  मुंबई : लॉकडाऊन घोषित करतेवेळी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी रिक्षाचालकांना १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली हाेती. त्यानुसार मुंबई, ठाण्यासह राज्यातील  परवानाधारक रिक्षाचालकांना मदतनिधी उपलब्ध करून देण्याची ऑनलाईन प्रक्रिया २२ मे पासून सुरू होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मदत वितरित करण्याचे निर्देश दिले होते.

  राज्याच्या परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले की, ऑनलाईन सुविधेमुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम अदा होणार आहे. त्यासाठी रिक्षाचालकांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. राज्य सरकारने ७.७५ लाख रिक्ष्ााचालकांसाठी १०७ कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा एप्रिलमध्येच केली होती. परंतु, वेबसाईटचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे ही रक्कम रिक्षाचालकांना अदा करता आली नाही. काही संघटनांनी रिक्षाचालकांकडून अर्ज भरून घेतले होते, त्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धत कार्यान्वित झाल्यानंतर यासंबंधी सूचना देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

  परिवहन आयुक्त कार्यालयाने रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर आर्थिक मदत थेट खात्यात वळती करण्यासाठी प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीद्वारे रिक्षा परवाना धारकांना त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद केल्यानंतर तत्काळ बँक खात्यावर आर्थिक मदत मिळणार आहे.

  राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण २१ मे रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

  सर्व रिक्षा परवाना धारकांना मदत देण्यासाठी लागणारा आर्थिक निधी शासनाकडून परिवहन आयुक्त कार्यालयास उपलब्ध झालेला आहे. अर्ज करणाऱ्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळत असल्यास त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे.

  - अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त