दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली माहिती

निशिकांत कामत यांना ३१ जुलैला काविळ आणि ओटीपोटात दुखत असल्यामुळे हैदराबामधील एआय़जी रुग्णालयात आणले गेले. त्यांच्यावर उपचार सुरु केले तेव्हा त्यांना यकृताचा रोग तसेच इतर संसर्ग झाल्याचे अहवालात आढळले. निशिकांत कामत यांना गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपेटालॉजिस्ट, क्रिटिकल केअर आणि इतर ज्येष्ठ सल्लागारांच्या मल्टीडिसिप्लिनरी टीमच्या देखरेखेखाली ठेवले आहे.

मुंबई : मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात यकृताच्या आजारावर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी आली  हेती. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर योग्य उपचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

निशिकांत कामत यांना ३१ जुलैला काविळ आणि ओटीपोटात दुखत असल्यामुळे हैदराबामधील एआयजी रुग्णालयात आणले गेले. त्यांच्यावर उपचार सुरु केले तेव्हा त्यांना यकृताचा रोग तसेच इतर संसर्ग झाल्याचे अहवालात आढळले. निशिकांत कामत यांना गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपेटालॉजिस्ट, क्रिटिकल केअर आणि इतर ज्येष्ठ सल्लागारांच्या मल्टीडिसिप्लिनरी टीमच्या देखरेखीखाली ठेवले आहे. तसेच त्यांची प्रकृती गंभीर असली तरी भीतीचे कोणतेही कारण नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. 

निशिकांत कामत यांनी अजय देवगण सोबत ‘दृश्यम’ सिनेमा केला आहे. तर इरफान खानसोबत ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘मदारी’ हा सिनेमा केला आहे. जॉन अब्राहमसोबत ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ केला आहे. रितेश देशमुख सोबतही ‘लय भारी’ तर सुबोध भावे बरोबर ‘फुगे’ सिनेमा केला आहे.