Anil Deshmukh case: CBI अनिल देशमुख यांना शोधून काढणार आणि…

देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. ईडीने आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाच समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र, पाचहीवेळा देशमुख यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार देत विवीध न्यायालयात त्यांच्या चौकशी विरोधात प्रकरणे प्रलंबीत असल्याचे कारण दिले आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात करण्यात आलेल्या खंडणी वसुली आरोप प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे.

    त्यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. ईडीने आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाच समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र, पाचहीवेळा देशमुख यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार देत विवीध न्यायालयात त्यांच्या चौकशी विरोधात प्रकरणे प्रलंबीत असल्याचे कारण दिले आहे.

    दरम्यान, देशमुख यांना ईडीने पुढील आठवड्यात सहाव्यांदा हजर राहण्याबाबत समन्स बजावले असून देशमुख हजर राहिले नाहीत तर त्यांना शोधून काढले जावू शकते, तसेच त्यांना देशाबाहेर जाण्यापासून विमानतळावर देखील रोखण्याचे अधिकार केंद्रीय तपास यंत्रणाना मिळाले आहेत अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]