प्रभाग रचनेवरील मतभेद, अतिवृष्टीमुळे नुकसान, सहकारी कारखानदारीवरील सकंट; राष्ट्रवादीने बोलावली तातडीची बैठक!

मागील सप्ताहात राज्य मंत्रिमंडळात दोन्ही काँग्रेसना डावलून बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत मुख्यमंत्र्याकडून घेण्यात आलेला निर्णय, राज्यात बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे घातला. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान आणि सहकारातील कारखानदारीला आयकर विभागाच्या आलेल्या नोटीसांच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीने मुंबईत बैठक(NCP calls emergency meeting) बोलावली आहे.

    मुंबई : मागील सप्ताहात राज्य मंत्रिमंडळात दोन्ही काँग्रेसना डावलून बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत मुख्यमंत्र्याकडून घेण्यात आलेला निर्णय, राज्यात बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे घातला. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान आणि सहकारातील कारखानदारीला आयकर विभागाच्या आलेल्या नोटीसांच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीने मुंबईत बैठक(NCP calls emergency meeting) बोलावली आहे.

    सहकारी कारखानदारी समोरच्या समस्याचा आढावा

    या बैठकीबाबत अधिक माहिती घेतली असता राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यभर झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबतचा आढावा शरद पवार या बैठकीत घेणार आहेत. या शिवाय या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेत झालेल्या बदलाबाबतच्या निर्णयावरून आघाडी सुरू असलेल्या नाराजीवरही चर्चा होणार आहे.

    या शिवाय नुकतेच राज्यातील सहकारी कारखान्याना आयकर विभागाने नोटीसा बजावल्या असल्याने मोठ्या प्रमाणात सहकारी कारखानदारी समोर समस्या निर्माण होणार आहेत, याबाबत संपूर्ण माहिती घेवून पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ६ ऑक्‍टोबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

    सहकार खात्याची जबाबदारी नव्या नेत्याकडे देण्याबाबत चर्चा

    या बैठकीत पवार यांच्याकडून अतिवृष्टीच्या नुकसानीचा अंदाज घेतला जाण्याची शक्यता आहे तसेच राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी पाहता राज्य मंत्रिमंडळातील सहकार खात्याची जबाबदारी नव्या नेत्याकडे देण्याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, केंद्रात अमीत शहा यांच्यासारख्या मातब्बर नेत्याकडे सहकार विभाग सोपविण्यात आला असून त्यांच्यामार्फत सहकारउद्योगावर नियंत्रण आणण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळे राज्यात सक्षम नेत्याकडे या खात्याची जबाबदारी देण्यात यावी यासाठी पवार यांच्याकडून चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

    या बैठकीला स्वत: शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे यांसह इतरही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.