Disley Guruji Corona Positive who won Rs 7 crore; Many leaders from the Chief Minister to Raj Thackeray had come in contact

लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी Whats App स्टेटसद्वारे  केलं आहे.

मुंबई : सात कोटींचा ग्लोबर टीचर पुरस्कार पटकावणारे रणजीत डिसले करोना पॉझिटिव्ह आले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची भेट घेतली होती.

लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी Whats App स्टेटसद्वारे  केलं आहे.

मुंबईहून बार्शीला परतल्यानंतर थकवा व इतर त्रास जाणवू लागला. त्यांच्या पत्नीला त्रास सुरू झाला. त्यामुळे डिसेली आणि त्यांच्या पत्नी दोघांनी कोरोनाची चाचणी केली असता डिसले दाम्पत्य करोनाबाधित आढळून आले. इतर कुटुंबीयांची चाचणी नकारात्मक आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःहू करोना चाचणी करून घ्यावी. यात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसलेंना जाहीर झाला. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी त्यांचा जाहीर सत्कार करुन त्यांचे कौतुक केले.