मराठमोळ्या डिसले गुरुजींचे राज ठाकरेंकडून कौतूक, पुरस्कारप्राप्ती नंतर गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी केलं दान

पुरस्कारप्राप्ती नंतर डिसले गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. हा खरा महाराष्ट्रधर्म!, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई : जागतिक शिक्षक पुरस्काराने ( Global Teacher Prize) सन्मानित मराठमोळे गुरुजी रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांनी कुटुंबियांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि डिसले गुरूजींनी अनेक विषयांवर चर्चा केली. दरम्यान, पुरस्कारप्राप्ती नंतर डिसले गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. हा खरा महाराष्ट्रधर्म!, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

डिसले गुरुजी यांना राज ठाकरे यांची शिक्षण क्षेत्राबाबत असलेली आवड चांगली वाटली आहे. महाराष्ट्राचं नाव शिक्षण क्षेत्रात आणखी उंचावण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं डिसले गुरूजी यांनी म्हटलं आहे.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनमार्फत दिला जाणारा ‘जागतिक शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित मराठमोळे गुरुजी श्री. रणजितसिंह डिसले ह्यांनी आज कुटुंबियांसमवेत मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची सदिच्छा भेट घेतली.