clean up marshal

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर क्लिनअप मार्शलमार्फत दंडात्मक कारवाई(Action By Clean Up marshal) करण्यात येते. मात्र कधी कधी या कारवाईवरून नागरिक व क्लिनअप मार्शल यांच्यात वादविवाद(Dispute With Clean Up Marshal) होत असतात.

    मुंबई: मुंबईत कोरोनाचा (Corona)प्रादुर्भाव असल्याने नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी मुंबई पालिकेच्या (BMC)‘क्लिनअप मार्शल’कडून(Clean Up Marshal Thrashed) नजर ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर क्लिनअप मार्शलमार्फत दंडात्मक कारवाई(Action By Clean Up marshal) करण्यात येते. मात्र कधी कधी या कारवाईवरून नागरिक व क्लिनअप मार्शल यांच्यात वादविवाद(Dispute With Clean Up Marshal) होत असतात. जुहू येथे अशाच एका प्रकरणात कारवाई करण्यावरून एक नागरिक व क्लिनअप मार्शल यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

    या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेने तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आर.ए. राजीव यांच्या माध्यमातून व पुढाकारातून २००६ मध्ये शहर स्वच्छ राखण्यासाठी व सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांना वचक बसावा यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असणारा अधिनियम तयार केला.

    मात्र या कायद्याची अंमलबजावणी करताना आतापर्यंत क्लिनअप मार्शल व संबंधित नागरिक यांच्यात वादविवाद होणे, शिवराळ भाषा वापरणे, आदी प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत पालिकेकडून क्लिनअप मार्शल यांच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी अथवा अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना न करण्यात आल्यामुळे अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत.

    जुहू येथे एका रस्त्यावर एका क्लिनअप मार्शलने एका नागरिकाच्या तोंडावरील मास्क जरा खाली सरकल्याने त्याच्यावर कारवाई करण्याच्या हेतूने त्या नागरिकाचा त्या अवस्थेतील एक फोटो मोबाईल कॅमऱ्याने काढला. त्यामुळे संबंधित नागरिकाला त्याचा राग आला. या प्रकरणावरून क्लिनअप मार्शल व नागरिकाचा वाद झाला व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. नागरिकाने त्या क्लिनमार्शलने हात उचलल्याचा आरोप केला. त्यावर तेथे जमलेल्या नागरिकांनी त्या क्लिनअप मार्शलवर हात उगारला. त्यावेळी त्या क्लिनअप मार्शलने जोरदार प्रतिकार केला. मात्र नागरिकांची संख्या वाढल्याने व त्याला मारहाण होऊ लागल्याने त्याने घटनास्थळापासून वेळीच पळ काढल्याने तो थोडक्यात बचावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हे प्रकरण पोलिसात गेले असून क्लिनअप मार्शलच्या डोक्याला मार लागल्याने त्याच्या डोक्याचा सिटी स्कॅनही करण्यात आले असल्याचे समजते. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका स्थायी समितीच्या आगामी बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.