MNS also opposes naming Navi Mumbai airport after Balasaheb Thackeray

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेने या विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. तर, रिपाईं अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे. दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चे नाव देणे नाकारले असते, असे सांगून नव्या वादाला फोडणी दिली आहे.

  नागपूर: नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेने या विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. तर, रिपाईं अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे. दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चे नाव देणे नाकारले असते, असे सांगून नव्या वादाला फोडणी दिली आहे.

  कोकणवासियांसाठी मोठा संघर्ष

  दि.बा. पाटील यांनी कोंकणवासियांसाठी मोठा संघर्ष केला. मराठवाडा नामांतर विद्यापीठाच्या आंदोलनातही ते पुढे होते. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचे नामकरण त्यांच्या नावेच असावे. खरे तर या विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी आपली इच्छा होती. परंतु, डॉ. बाबासाहेबांच्या नावे नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर बाळासाहेबांचे नाव इतरही ठिकाणी दिल्या गेले आहे. आता त्यांचे नाव नकोच असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

  महत्त्वपूर्ण योगदान

  नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान दिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखील दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चे नाव देणे नाकारले असते. नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा. दोन्ही नावाला आमचा पाठिंबा आहे असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगीतले.

  हे सुद्धा वाचा