पालिका निवडणुकीसाठी काॅंग्रेस सक्रीय ; सायन काेळीवाडा आणि माटुंगा येथील मुलांना लॅपटाॅप आणि टॅबचे वितरण

विद्यार्थ्यांना लॅपटाॅप आणि टॅबचे वितरण करून विद्यार्थांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी चांगली सुविधा निर्माण करून दिली असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. काेराेनाच्या अडचणीच्या काळात लॅपटाॅप आणि टॅबच्या माध्यमातून चांगले शिक्षण घ्यावे, असा माैलिक सल्ला काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विद्यार्थ्यांना दिला. महापाैरांनीही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या या साहित्याबद्दल कौतूक केले.

    मुंबई – काॅंग्रेसने आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेस पक्ष सक्रीय झाला असून सायन काेळीवाडा आणि माटुंगा भागातील विद्यार्थ्यांना काॅग्रेसतर्फे आज लॅपटाॅप आणि टॅबचे वितरण केले. शाळा ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना लॅपटाॅप आणि टॅबचा उपयाेग हाेणार आहे.

    पहिल्या लाॅकडाऊन पासून मुंबईतील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटाॅप घेणे शक्य नाही. ही अडचण ओळखून काॅंग्रेसचे मुंबई महानगर पालिकेतील विराेधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 176 मध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना महापाैर किशाेरी पेडणेकर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते माेफत लॅपटाॅप आणि टॅबचे वितरण सायन काेळीवाडा आणि माटुंगा भागातील विद्यार्थांना केले. 133 लॅपटाॅप आणि 74 टॅबचे वितरण करण्यात आले. सायन काेळीवाडा येथील गुरूनानक हायस्कूलमध्ये या समारंभाचे आयाेजन केले हाेते.

    विद्यार्थ्यांना लॅपटाॅप आणि टॅबचे वितरण करून विद्यार्थांना आॅनलाईन अभ्यासक्रमासाठी चांगली सुविधा निर्माण करून दिली असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. काेराेनाच्या अडचणीच्या काळात लॅपटाॅप आणि टॅबच्या माध्यमातून चांगले शिक्षण घ्यावे, असा माैलिक सल्ला काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विद्यार्थ्यांना दिला. महापाैरांनीही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या या साहित्याबद्दल कौतूक केले.

    लॅपटाॅप आणि टॅबचे वितरण करण्याच्या अशा कार्यक्रमातून काॅंग्रेसने आता लाेकांपर्यंत पाेचण्यासाठी सुरूवात केली आहे. काॅग्रेसने एकला चलाेरे ची भुमिका घेतल्याने निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आता काॅंग्रेस पक्ष वाटचाल करीत असल्याचे या निमित्ताने दिसून आले.