खासदार संभाजीराजेंच्या भाजप विरोधी भूमिकेसमोर मराठा आंदोलनासाठी भाजपच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे

  मुंबई (Mumbai).  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर (issue of Maratha reservation) संयमी भूमिका घेत निर्णायक मार्ग काढण्यासाठी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती (BJP MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्यभर दौरा (a statewide tour) सुरू केला आहे. मात्र या दौऱ्यात  संभाजीराजे छत्रपती यांनी सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) पक्षीय धोरणाविरोधात (Partys partisan policy) मते मांडल्याने यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असून भाजपचे इतर मराठा नेतेही (Maratha leaders) आता राज्यभर दौरा करणार आहेत.

  विनायक मेटेची संघर्षाची भूमिका (Vinayak Metes role in the struggle)
  प्रत्येक नेता जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणावरील पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द झाले त्यानंतर राज्याना अधिकार नसल्याचे सांगत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान १०२व्या घटना दुरूस्ती संदर्भात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

  या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे संघर्षाची भुमिका घेत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यभर दौरे काढून ही वेळ मोर्चे काढण्याची नाही असे सांगत संयमी भुमिका घेताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपनेही आता पक्षातील मराठा नेत्यांना दौ-यावर लावले आहे. भाजपने पक्षातील सर्व मराठा नेत्यांना जिल्हावार दौरा करण्याचे आदेश दिले आहेत.

  असे नेते-असे दौरे (Such leader-like tours)
  हे मराठा नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाजाला भाजपची भूमिका समजावून सांगतील. या यादीत भाजपचे खासदार नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र पाटील आदी नेते जिल्हावार दौरा करणार आहेत. प्रत्येक नेत्याला एक जिल्हा वाटून देण्यात आला आहे. त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाची सविस्तर भूमिका मांडण्याचे काम हे नेते करणार आहेत. याशिवाय  प्रवीण दरेकर – रायगड, प्रसाद लाड– रत्नागिरी, रवींद्र चव्हाण– सिंधुदुर्ग, आशिष शेलार– नांदेड, बीड, नारायण राणे – पुणे, ठाणे, हर्षवर्धन पाटील – सातारा, संभाजी पाटील निलंगेकर – औरंगाबाद, जालना, नरेंद्र पाटील- अकोला, बुलढाणा अश्या प्रकारे नेते दौरा करत आहेत.