केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३% डीए वाढवण्याची घोषणा, एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार लाभ

गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) ३%ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीसह डिए ३१% झाला आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए वाढवण्याचा फायदा होणार आहे, त्यामुळं दिवाळीआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) ३%ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीसह डिए ३१% झाला आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए वाढवण्याचा फायदा होणार आहे, त्यामुळं दिवाळीआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या गतिशक्ती प्रकल्पालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळातील या निर्णयांची माहिती दिली.

    सरकारच्या तिजोरीतून वार्षिक ९,४८८.७० कोटी रुपये खर्च 

    डीए वाढवण्याच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘औद्योगिक कामासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे डीए निश्चित केला जातो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता १ जुलै २०२१ पासून ३% ने वाढवला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारचे ४७ लाख १४ हजार कर्मचारी आणि ६८ लाख ६२ हजार पेन्शनधारकांना फायदा होईल. यामुळे सरकारला वार्षिक ९,४८८.७० कोटी रुपये खर्च येणार आहे.

    पंतप्रधान गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान मंजूर

    केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनची ​​अंमलबजावणी देशात मंजूर झाली आहे, पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनची ​​देखरेख तीन स्तरीय प्रणालीमध्ये केली जाईल. ज्याचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव असतील. त्यांच्या अध्यक्षतेखाली सचिवांचा एक सशक्त गट तयार केला जाईल.

    डीए दर वर्षातून दोनदा वाढवला जातो

    सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (डीए) दर साधारणपणे दरवर्षी दोनदा वाढवला जातो. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत डीए दरात वाढ अपेक्षित होती. ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या त्यांच्या मूळ वेतनाच्या २८% डीए म्हणून मिळतात. या दरवाढीनंतर महागाई भत्ता ३१%वर गेला आहे.

    १०० करोड भारतीयांच्या लसीकरणाला ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

    दरम्यान भारतीयांनी १०० कोटीचे लसीकरण पूर्ण केले आहे, त्यामुळं देशात अनेक ठिकाणी कार्यक्रम साजरे केले जात आहेत. तसेच या लसीकरणाच्या मोहिमेत ज्यांनी सहभाग घेतला, ते म्हणजे डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका, वॉर्डबॉय, आरोग्यविभागातील कर्मचारी इत्यादींचे अभिनंदन केले जात आहे, या सर्वांचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.