शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, काँग्रेस- NCP सोबत आघाडी नको हाच आवाज येईल : सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते प्रविण दरेकर यानी याबाबत रायगड जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांची भावनाच गीते यांनी व्यक्त केली असून तिच राज्यातील ज्येष्ठ शिवसेना नेत्यांची भावना आहे असे म्हटले आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून हाच आवाज येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे हे राजकीय आत्महत्याच आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    मुंबई : शिवसेना नेते अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असे खळबळजनक विधान केल्यानंतर त्यावर चहूबाजूंनी राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

    सामान्य शिवसैनिकांची भावनाच गीते बोलले

    भाजप नेते प्रविण दरेकर यानी याबाबत रायगड जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांची भावनाच गीते यांनी व्यक्त केली असून तिच राज्यातील ज्येष्ठ शिवसेना नेत्यांची भावना आहे असे म्हटले आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून हाच आवाज येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे हे राजकीय आत्महत्याच आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली

    सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय राऊतांचा अपवाद जर सोडला तर राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचे जेवढे कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचे कौतुक करतात. ते म्हणाले की, अनंत गीते हे हृदयपासून बोलत होते. जे बोलत होते ते ऐतिहासिक सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर अशी दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली हे बघून बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती. माझी शिवसेना देव, देश आणि धर्मासाठी काम करत आली आहे, असेही ते म्हणाले

    आम्ही राष्ट्रवादीला पायाखाली तुडवू

    प्रविण दरेकर म्हणाले की, या पूर्वी आमदार प्रताप सरनाईक यानी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून जे सांगितले किंवा परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी जे भाष्य केले. तेच गिते म्हणाले आहेत. ही आघाडी अकबर-बिरबलाच्या कहाणी सारखी आहे. वेळ आली तर आम्ही राष्ट्रवादीला पायाखाली तुडवू असे ते म्हणाले होते.