सिटी बॅंक घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे माहिती आहे का? ज्यामुळे आनंदराव अडसूळ अडचणीत आलेत

सिटी बॅंक घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे माहिती आहे का? हा घोटाळा पाच दहा नाही तर तब्बल 900 कोटींचा असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर करण्यात आलाय.

    मंत्री अनिल परब यांच्या नंतर आता शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार माजी मंत्री आनंदराव अडसूळ ईडीच्या रडावर आले आहेत. सिटी बॅंक घोटाळा प्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावला होता. यात त्यांना साडेआठ वाजता ईडी कार्यालयात हजर रहाण्यासं सांगीतलं होतं. पण, आनंदराव अडसूळ कामानिमीत्त दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती मुलगा अभिजीत अडसूळ यांनी दिली. आता ईडीचं पथक थेट अडसूळ यांच्या घरीच पोहोचलंय.

    बातम्यांमुळे ही अपडेट आता सर्वांनाच समजलेय. पण, लोकहो तुम्हाला हे सिटी बॅंक घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जास्त लोड घेऊनका आम्ही सांगतो.

    हे सर्व प्रकरण आहे अमरावती जिल्ह्यातील 5 जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या 13 ते 14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.

    आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे.