महापालिका निवडणुकांमध्ये भाजपासोबत आघाडी करायची का? राज ठाकरे मनसे नेत्यांना काय आदेश देणार

महत्त्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील गणित जुळवून घेताना भाजपासोबत आघाडी करायची का? यावरदेखील मनसेच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुळे आज होणाऱ्या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात हे पाहणं गरजेचे आहे.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपासोबत आघाडी करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, आता यावर मनसे प्रमुख राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात. याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचे महत्वाची बैठक होणार आहे.

राज्यभरातील ग्रामपंचायती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवाव्यात असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेत. अनेक पदाधिकारी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधही निवडून आले आहेत. यामुळे मनसेच्या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांच्यासह अनेक भागात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत उमेदवार उभे केले आहेत, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील पक्षांसोबत आघाडी केली आहे. अनेक पदाधिकारी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधही निवडून आले आहेत.

येत्या काही महिन्यात राज्यात कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, वसई-विरार, नवी मुंबई आणि औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी पक्षसंघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे, यात राज ठाकरे वैयक्तिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील, या बैठकीपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या परिसरातील स्थानिक राजकीय माहिती, समस्या आणि मनसेचे कार्य याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती.

महत्त्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील गणित जुळवून घेताना भाजपासोबत आघाडी करायची का? यावरदेखील मनसेच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुळे आज होणाऱ्या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात हे पाहणं गरजेचे आहे.