कोरोनामुळे विक्रोळीतील एका डॉक्टरचा मृत्यू

मुंबई: कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मुंबईत डॉक्टरला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.विक्रोळीतील एका दातांच्या डॉक्टरचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. संबंधित ५९ वर्षीय डॉक्टरला

मुंबई: कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मुंबईत डॉक्टरला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.विक्रोळीतील एका दातांच्या डॉक्टरचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. संबंधित ५९ वर्षीय डॉक्टरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यांनी ‘कोरोना’ची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांना पवईतील रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच आज उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. डॉक्टरांच्या पार्थिवावर मुंबई महापालिकेच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे विक्रोळी भागात त्या डॉक्टरचा दवाखाना होता. ते सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असल्याने त्यांचा मृत्यूची बातमी पसरताच सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.