कोरोना संक्रमित डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने झाला मृत्यू

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी खाटा मिळत नसल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याबाबत राज्य आरोग्य विभागाकडेही अनेक मुंबईकरांनी तक्रारही केली आहे, पण कोरोना

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी खाटा मिळत नसल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याबाबत राज्य आरोग्य  विभागाकडेही अनेक मुंबईकरांनी तक्रारही केली आहे, पण कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टरला उपचाराकरीता खाट उपलब्ध न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. हे डॉक्टर कान, नाक, घसा आजराकरिता स्पेशालिस्ट होते. ते कोरोना संक्रमित होते. रहेजा हॉस्पिटलमध्ये १० तास वाट पाहिल्यानंतरही त्यांना उपचारासाठी  खाट उपलब्ध नाही झाली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या डॉक्टरने काही दिवसांपूर्वी एका रुग्णावर शस्त्रक्रिया केली होती, या शस्त्रक्रीयेनतर त्यांची प्रकृती बिघडत गेली व ते कोरोना संक्रमित झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघड़ू लागली, ज्यामुळे ते स्वतः गाडी चालवत ते रुग्णालयात पोहोचले. पण उपचारासाठी खाट उपलब्ध नसल्याने त्यांना १० तास वाट पाहावी लागली. उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.  त्यांची पत्नी व मुलगी या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे