६० वर्षीय मधुमेही व्यक्तीचा पाय वाचवण्यात डॉक्टरांना यश

मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे मुंबईतील एका ६० वर्षीय व्यक्तीला महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे उपचारास विलंब केल्यानं या व्यक्तीच्या डाव्या पायाला (गँगरिन) गंभीर दुखापत झाली होती. वेळीच उपचार मिळाले नसते तर पाय गमवावा लागला असता.

मुंबई : मधुमेहा(diebetis)कडे दुर्लक्ष करणे मुंबईतील एका ६० वर्षीय व्यक्तीला महागात पडलं आहे. लॉकडाऊन(lockdown)मुळे उपचारास विलंब केल्यानं या व्यक्तीच्या डाव्या पायाला (गँगरिन) गंभीर दुखापत झाली होती. वेळीच उपचार मिळाले नसते तर पाय गमवावा लागला असता. परंतु, अशा स्थितीतही चेंबूर येथील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या व्यक्तीचा पाय वाचवला आहे. यावरून लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक भितीपायी स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पण वेळीच उपचार न झाल्यास आजार बळावू शकतो. याचा प्रत्यय नुकताच आला आहे.

चेंबूरमध्ये राहणारे पंकज शहा (नाव बदललं आहे) मागील १५ वर्षांपासून शहा मधुमेह आजारासह जगत आहेत. कोरोनाच्या काळावधीत पायाला दुखापत झाली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्याची भिती वाटत असल्याने त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. साधारणतः एक महिन्यांनंतर त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी पाय कापण्याचा सल्ला दिला. परंतु, काहीही करून पाय वाचला पाहिजे, यासाठी कुटुंबियांनी त्यांना तातडीने ७ जुलै रोजी चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयात (Zen Multispeciality Hospital) दाखल केले. या रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर कुटुंबियांच्या परवानगीनुसार १३ जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली.

याबाबत माहिती देताना चेंबूरच्या झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणाले की, या रूग्णाच्या डाव्या पायाच्या खाली गंभीर (गँगरीन) दुखापत झाली होती. अनियंत्रित रक्तातील साखरेच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या उद्भभवली होती. जेव्हा आपल्या शरीराच्या विशिष्ट भागात रक्तप्रवाहात व्यत्यय येतो, अशी स्थितीत गँगरीन होण्याची शक्यता बळावते. या रूग्णाची दुखापत जास्त असल्याने वेळीच उपचार झाले नसते तर पाय गमवावा लागला असता. परंतु, रूग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांचा पाय वाचवला आहे. सध्या ही जखम खुली असल्याने आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.

डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लोक कोविडच्या संसर्गाच्या भीतीमुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि गंभीर परिस्थितीत स्वतःवर ओढावून घेतात. याशिवाय साथीच्या आजारामुळे लोक डॉक्टरांना भेटायला घाबरत असून स्वतःच औषधोपचार घेतात आणि उपचाराला उशीर झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रूग्णालयात येतात. अशा स्थितीत उपचार करणं डॉक्टरांसाठी अवघड जातं. काहींना शस्त्रक्रियाची आवश्यकता असते. त्यामुळे त्वरित उपचार घेतल्यास या आजारातून पूर्णपणे बरं होता येऊ शकतं”